‘भोंगा’ चित्रपट म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट; किशोरी पेडणेकर
मुंबई : ३ मे ला ‘भोंगा’ चित्रपट रिलीज होणार आहे. आज या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे. दरम्यान चित्रपट प्रदर्शनाआधीच यावरुन वाद होन्याक्सचे चित्र आहेत.
या चित्रपटवरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठी टीका मनसेवर केली आहे. ‘भोंगा’ चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे. असं त्या म्हणाल्या. ‘मनसेनं भोंग्याची पार्श्वभूमी चांगली तयार केली. आधी सामाजिक मग धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कसा करता येईल हे मनसेकडून शिकावं,’ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
3 तारखेला मिटिंग घेणार म्हणे मुंबईचे वातावरण यांनी तापवलं आणि तेवढ्यात हा भोंगा चित्रपट प्रदर्शित करत आहे. भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी हे सगळं मनसेने केलं आहे. मनसेचा हा सगळा 100 टक्के पब्लिसिटी स्टंट होता. भोंगा 2019 ला प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी लाव रे तो व्हिडिओ सुरु झाला होता, असंही पेडणेकर म्हणाल्या.