बिग बॉस १६ संपण्यापूर्वीच शालीनच्या पहिल्या पत्नीने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा; लवकरच मुलाला घेऊन जाणार UKला
![बिग बॉस १६ संपण्यापूर्वीच शालीनच्या पहिल्या पत्नीने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा; लवकरच मुलाला घेऊन जाणार UKला Dalljiet Kaur shalin bhanot nikhil patel](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/02/Dalljiet-Kaur-shalin-bhanot-nikhil-patel.jpg)
मुंबई : बिग बॉस १६ मध्ये (Big Boss 16) फायनलला पोहोचलेल्या शालीन भनोटच्या (Shalin Bhanot Big Boss 16) पत्नीने तिच्या दुसऱ्या लग्नाचा साखरपुडा उरकून घेतला आहे. काल (शुक्रवार, ०३ फेब्रुवारी) शालीनची पत्नी दलजीत कौरचा (shalin Bhanots Wife Dalljiet Kaur – Big Boss 13) साखरपुडा पार पडला आहे. शालीन सोबतचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर दलजीत युकेत राहणाऱ्या निखील पटेल (Nikhil Patel from UK -Dalljiet Kaur) नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. आता एका नवीन आयुष्याची सुरुवात करायला ती निघाली आहे. लवकरच दलजीत आणि निखील विवाहबंधनात अडकणार असून लग्नानंतर ते युकेला शिफ्ट होणार असल्याची माहिती तिने दिली आहे.
शालीन भनोट (Shanil Bhanot – Big Boss ) आणि दलजित कौर (Dalljiet Kaur) हे २००९ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. मात्र, २०१५ मध्ये शालीनकडून दलजीतला मारहाण होत असल्याचा आरोप करत तिने घटस्फोट घेतला. त्यांनी एकाच टीव्ही सिरीयलमध्ये सोबत काम देखील केले होते. दलजीत बिग बॉस १३ मध्ये (Big Boss – 13) सहभागी होती, त्यांनतर ती लोकप्रिय झाली.
दलजीतचा होणारा पती आहे युकेमध्ये राहतो. एका फायनान्स कंपनीत तो नोकरी करतो अशी माहिती आहे. या वर्षी मार्च महिन्यात ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर दलजीत आपल्या मुलाला जेडन याला विदेशात घेऊन घेऊन जाणार आहे.