ताज्या बातम्यामनोरंजन

बिग बाॅस फेम जॅस्मिन भसीनने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुंबई | Bigg Boss Fame Jasmin Bhasin Made A Shocking Revelation – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जॅस्मिन भसीन ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बाॅस 14 मध्ये सामिल झाल्यानंतर जॅस्मिन चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. सोशल मीडियावर देखील ती चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. तसंच जॅस्मिनला चाहत्यांकडून जितकं प्रेम मिळतंय तितकाच तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे. याच संदर्भात तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

जॅस्मिन भसीननं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “ट्रोलिंग तर होत असतंच, पण त्या व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मला लोकांकडून बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. आणि ते कशाबद्दल? फक्त यासाठी की मी एका शो मध्ये सहभागी झाले आणि त्यात मी त्यांना आवडले नाही म्हणून”.

“मी ज्याचा सामना केला ते खूपच गंभीर प्रकरण होतं. या सगळ्या गोष्टींनी मानसिक पातळीवर माझ्यावर खूप परिणाम केला आहे. पण मानसोपचार तज्ञांच्या, कुटुंबाच्या आणि माझ्या जवळच्या मित्रपरिवाराच्या मदतीनं मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकले”, असंही जॅस्मिननं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये