Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

“राष्ट्रपती पदासाठी भाजपकडे बहुमत नाही”

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यानंतर आता विधान परिषदेचा आखाडा सज्ज झाला असून त्यासोबतच राष्ट्रपती पदासाठीही निवडणूक रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार उभे राहिले नाहीत. आता सत्ताधारी पक्षाकडून एखादं नाव पुढे येईल. कारण देशात त्या तुलनेत तगडा उमेदवारच नाही. आता या पदावर सत्ताधारी पक्षातला नेताच पाठवला जाणार. पवार यासाठी हो म्हणाले असते तर रंगत आली असती. पवारांच्या बाजूने पारडं झुकलंही असतं. सत्ताधारी पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान,  देशाला आतापर्यंत मोजकेच राष्ट्रपती चांगले मिळाले. नाहीतर नेहमीच सत्ताधारी पक्षाने आपल्या मर्जीतील नेत्याला राष्ट्रपती पदावर निवडून दिलं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये