द्रौपदी मुर्मूंचा ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून उल्लेख केल्याने, सोनिया गांधींनी माफी मागावी: भाजप
![द्रौपदी मुर्मूंचा ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून उल्लेख केल्याने, सोनिया गांधींनी माफी मागावी: भाजप Narendra Modi And Sonia Gandhi](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/Narendra-Modi-And-Sonia-Gandhi-.jpg)
नवी दिल्ली : (BJP Leader On Congress Leader) काॅंग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांच्याकडून लोकसभेत अन् अवधानानं द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटलं होतं. त्यानंतर लोकसभेत आणि रस्त्यावर काॅंग्रेस नेत्यानं केलेल्या वक्तव्यावर भाजप चांगलेचं आक्रमक पहायला मिळाले. यावरुन एकच वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्यांकडून जाणूनबूजून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपनं लोकसभेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर माफ मागावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींवर टीका करताना त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली. देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करण्याची परवागनी सोनिया गांधींनी दिली, असा आरोप इराणी यांनी लोकसभेमध्ये बोलताना केला. तसेच त्यांनी सोनिया गांधी या आदिवासीविरोधी, दलितविरोधी आणि महिलाविरोधी असल्याचा आरोप देखील यावेळी इराणी यांनी केला आहे.
ज्या खासदारामुळं लोकसभेत हे वादंग निर्माण झालं आहे. त्या अधिर रंजन चौधरी यांनी या प्रकरणात माफी मागितली असून आपली जीभ घसरल्यानं चूकून आपण तो शब्द वापरल्याचं म्हटलं आहे. भाजप “राईचा पर्वत करत आहे,” अशी टीकाही चौधरी यांनी केली. चौधरी यांनी जीएसटी, अग्निपथ योजना, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे करत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.