ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

अजित पवारांच्या शपथविधीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण; फडणवीसांना लिहिलेले पत्र चर्चेत

पुणे | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. त्यानंतर आता भाजपने कुरघोडी केल्याची चर्चा रंगत आहे. मात्र भाजपची ही खेळी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याला रुचली नसून सदर पदाधिकाऱ्याने भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामुळे तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचे समोर आले आहे. पुणे ग्रामीण भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे पुणे जिल्ह्यात मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढे दिवस ज्यांच्याविरोधात काम केले आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कालचा शपथविधीने भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार? मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना? आम्हा निष्ठवंतांची काही सोय केलीये का? असे पत्राद्वारे पाच प्रश्न पारखी यांनी फडणवीसांना विचारले आहेत. साहेब जमलं तर जरूर उत्तर द्या, अशी सादही त्यांनी घातली आहे. आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्नही नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये