महाराष्ट्ररणधुमाळी
विधान परिषदेसाठी भाजपची ‘अशी’ असणार रणनिती!
![विधान परिषदेसाठी भाजपची 'अशी' असणार रणनिती! devendra fadnavis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/devendra-fadnavis--780x470.jpg)
मुंबई : (BJP On Plan ready Legislative Council Election) भाजपच्या नेत्यांचा राज्यसभा निवडणूकांच्या विजयाचा रंगलेला गुलाल निघतो न निघतो. तोच आता विधान परिषदांच्या दहा जागांच्या निवडणूकींसाठी राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राज्यसभेत मिळवलेल्या विजयामुळं भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. त्यानुसार भाजप आता निधानपरिषदेच्या निवडणूकीच्या तयारीला लागली आहे. रात्री भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली त्यानुसार जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांवर होवू घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने एक प्लाॅन तयार करुन, रणनीती आखली आहे. यापूर्वी राज्यसभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती. मात्र, आता विधान परिषदेसाठी निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर या तिघांवर विभागून देण्यात आली आहेआपल्या सर्व मतांचे गणित लक्षात घेऊन, भाजपने विधान परिषदेत पाच उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.