Top 5ताज्या बातम्यापुणे

भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ट पुणे शहर अध्यक्ष पदी श्री. जतिन पांडे यांची निवड

पुण्यातील अष्टपैलू कलाकार श्री. जतिन पांडे (Jatin Pandey) यांची भाजपा (BJP) सांस्कृतिक प्रकोष्ट अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून प्रदेश अध्यक्षा अभिनेत्री प्रिया ताई बेर्डे (Priya Berde) यांनी त्यांचे नियुक्ती पत्र बहाल केले. पांडे यांनी केलेले काम पक्ष वाढीसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. जतिन पांडे हे अ. भा. मराठी नाट्य परिषद पुणे शाखा येथे कार्यकारिणी सदस्य, बालरंगभूमी परिषद येथे सहकार्यवाह तसेच नृत्य परिषद महाराष्ट्र येथे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेली 28 वर्षे नृत्य, नाट्य, लेखन, निवेदन क्षेत्रात ते काम करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये