ताज्या बातम्यादेश - विदेश
भाजपचे देशात अनेक मिनी पाकिस्तान बनवण्याचे प्रयत्न…

जम्मू-कश्मीर : सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम वाद उफाळून आला आहे. त्यातच आता हनुमान चालिसा आणि मशिदवरील भोंगे यांसारखे मुद्देही समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या महबूबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. धर्मनिरपक्षतेवर बुलडोझर चालवून भाजप देशात अनेक मिनी पाकिस्तान बनवत आहे, असा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अल्पसंख्याकांच्या घरावरच नाही, तर देशातील धर्मनिरपेक्षा संस्कृतीवर बुलडोझर चालवत आहे. केंद्र सरकार प्रत्येक मुद्द्यावर सपशेल अपयशी ठरले असून रोजगार, बुडती अर्थव्यवस्था, महागाई या समस्येवरून लक्ष भरकटवण्यासाठी हिंदू-मुस्लिम विभाजनाचा उपयोग करत आहे, असा घणाघात त्यांनी केला. मुफ्ती पुढं म्हणाल्या, केंद्र सरकार भारतामध्येच अनेक मिनी पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याक लोकांना खुलेआम पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.