भाजपचे जयराम ठाकूर निवडणुकीत सहाव्यांदा जिंकले, पण सत्तेच्या गोळाबेरीजेत हरले

शिमला | Himachal Election Result 2022 – बहुचर्चित हिमाचल प्रदेश निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jairam Thakur) यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. जयराम ठाकूर यांनी सहाव्यांदा या निवडणुकीत बाजी मारली आहे.
जयराम ठाकूर 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, सत्तेच्या गोळाबेरीजेत भाजप अजूनही पिछाडीवर असून काँग्रेस पक्ष 38 जागांवर आघाडीवर आहे. 68 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी आज (8 डिसेंबर) होत असून या निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये अतितटीचा सामना पाहायला मिळत आहे.
जयराम ठाकूर यांना 37,227 मतं मिळाली आहेत. तर, काँग्रेसचे (Congress) उमेदवार गीत राम यांना एकूण 9,755 मतं मिळाली आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवार गीता नंद यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर या विधानसभा जागेवर आप उमेदवाराला केवळ 230 मतं मिळाली आहेत.