ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अजित पवार गटातील नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू, सही कर नाहीतर…”, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मुंबई | Rohit Pawar – शरद पवार (Sharad Pawar) गटातील एका आमदाराचे आणि खासदाराचे समर्थन असलेले प्रतिज्ञापत्र अजित पवारांना (Ajit Pawar) दिल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. याबाबत बोलताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवार गटावर गंभीर आरोप केला. अजित पवार गटातील काही नेते ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, एका आमदारानं आणि एका खासदारानं अजित पवार गटात खरच नाव दिलं आहे का हे बघावं लागेल. तसंच आमदारांचं एखादं महत्त्वाचं काम त्यानं प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केलं जात नसल्याच्या घटना घडत आहेत. तर ब्लॅकमेलिंग करून सह्या घेतल्या जात आहेत. तु सही कर नाहीतर तुझं काम होणार नाही असं सांगितलं जातंय, असा दावा पवारांनी केला आहे.

अजित पवार गटानं शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे त्या आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करत विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात रोहित पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष काल दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी तिथूनच अजित पवार गटाला फोन केला असेल आणि त्यानंतर हे करण्यात आलं असेल. ही त्यांची रणनिती असू शकते. पण हा लढा कोर्टात जाईल आणि विजय आमचाच होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये