बहुचर्चित ब्रह्मास्त्रला बॉक्सऑफिसवर हादरा; ‘हे’ कारण आलं समोर!

box office Bramhastra Bollywood movies : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भुमिका असलेला ब्रम्हास्त्र हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवताना दिसत होता. मात्र, सध्या एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यांच्यामध्ये कमाईसाठी बराच संघर्ष सुरू आहे. हिंदी चित्रपटसृष्टीपासून ते दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत सर्वच चित्रपट एकमेकांच्या स्पर्धेत उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या बॉलीवुड चित्रपटाला आता ‘सीता रामम’ सारखा दाक्षिणात्य चित्रपट आव्हान देत आहे. शिवाय इतरही दर्जेदार चित्रपट रिलीज झाले असून यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ च्या गल्ल्यावर सध्या मोठा हदरा बसताना दिसत आहे. प्रचंड विरोध आणि वादानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत अनेक रेकॉर्ड तोडले.
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने १३व्या दिवशी केवळ 3.40 कोटींची कमाई केली आहे, त्यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 227.30 च्या आसपास पोहोचले आहे. वेंदु थनिधाथु कडू – ‘वेंधु थानिधाथु कडू’ या दाक्षिणात्य चित्रपटाची चमकही बॉक्स ऑफिसवर ओसरताना दिसत आहे. रिलीज होताच थैमान घालणाऱ्या या चित्रपटाला आता चांगलाच फटका बसताना दिसत आहे.