फोनला रेंज नसताना सुद्धा करता येणार कॉल; जाणून घ्या ‘ही’ ट्रिक्स!
![फोनला रेंज नसताना सुद्धा करता येणार कॉल; जाणून घ्या 'ही' ट्रिक्स! amitabh gupta 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/amitabh-gupta-2-780x470.jpg)
अनेक वेळा आपल्या मोबाईलच्या खराब नेटवर्कमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या नेटवर्कच्या समस्येमुळे कधी- कधी आपली अत्यावश्यक कामं सुद्धा रखडतात. आता या समस्येवर तोडगा निघाला असून आता फोनला नेटवर्क नसतानाही कॉलिंग सहजपणे करू शकणार आहे. यासाठी काही ट्रिक्स आपण जाणून घेणार आहोत. ही सुविधा आपल्याला Jio आणि Airtel सह सर्व नेटवर्क प्रदात्यांद्वारे प्रदान केली जाते. त्याला Wi-Fi Calling असं नाव देण्यात आलं असून तुम्हाला हे वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्स कराव्या लागणार आहेत. मग तुम्हला नेटवर्क कनेक्शन नसताना देखील कॉल करण शक्य होणार आहे.
प्रथम तुम्हला सेटिंग्जमध्ये जावं लगणार आहे तेथे गेल्यावर वायफाय कॉलिंगचा पर्याय चालू ठेवावा लागणार आहे. मग तुमच Wi- Fi कॉलिंग चालू होईल. पण जर तुम्ही iPhone वापरत असाल तर तुम्हाला त्याच्यासोबत मोबाईल डेटा देखील चालू ठेवावा लागणार आहे. हे तुम्हाला सेटिंग्जमध्ये दिसेल. त्यात गेल्यावर तुम्हाला वायफाय कॉलिंगचा पर्याय दिसेल. हा पर्याय चालू केल्यानंतर फोनमध्ये Wi- Fi कॉलिंग चालू होईल. जर तुम्ही नेटवर्क एरियाच्या बाहेर गेलात किंवा फोनला वायफाय कनेक्ट केलेले असेल, तर वायफाय कॉलिंग सहज चालू होईल.
दरम्यान, तुम्हाला हे सर्व करताना Wi Fi कॉलिंगसाठी Wi Fi Connect असण सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही वायफाय कक्षेत नसाल तर कॉलिंग करता येणार नाही. तसंच कॉलिंग ही पूर्णपणे वायफायच्या नेटवर्कवर आधारित आहे. यामुळे तुम्हाला सुरवातीला तुमचे वायफाय नेटवर्क चांगले आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे.