युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या उमेदवारांचे; चंद्रकांत पाटीलांनाकडून कौतुक!
![युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या उमेदवारांचे; चंद्रकांत पाटीलांनाकडून कौतुक! Sharad Pawar And Devendra Fadanvis 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/Sharad-Pawar-And-Devendra-Fadanvis-2-780x470.jpg)
पुणे : Chandrakant patil On UPSC Exam Result | आज केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी ट्वीट करत यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. यावर्षीच्या युपीएससीच्या (UPSC) परीक्षेत पहिल्या चार टॉपर्स या मुलीच आहेत. यामुळे पाटील यांनी स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात कमी नसल्याचं म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आजच UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत ही आनंदाची बातमी आहे की,पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतं आहे. तरी यश मिळवणाऱ्या सर्व स्त्री शक्तीला सलाम आणि यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन! अशा शब्दात पाटील यांनी कौतुक करत शुभेच्या दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वक्तव्य केलं होतं. पाटील यांच्या त्या वक्तव्यानंतर ते चांगलेच चर्चेत होते. चंद्रकांत पाटील यांनी “घरी जा आणि स्वयंपाक करा” असं सुप्रिया सुळेंना म्हटलं होतं. यामुळे त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला होता.