गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर “सिम्बायोसिस स्किल्स डे” साजरा

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे
पुणे : सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे दिनांक १६ आणि १७ सप्टेंबर रोजी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर “सिम्बायोसिस स्किल्स डे” उत्साहात साजरा. “सिम्बायोसिस स्किल्स डे” हा यावर्षी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर उत्साहात साजरा करण्यात आला आहे. “सिम्बायोसिस स्किल्स डे”चे उद्घाटन हे एसएसपीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी श्री मनोजकुमार डॅनियल (उपमहाव्यवस्थापक, मल्टिमॉडल इंटिग्रेशन, महामेट्रो) आणि श्री. राजेश जैन (सहायक महाव्यवस्थापक, महामेट्रो) इत्यादी उपस्थित होते.
यादिवशी सिम्बायोसिसतर्फे गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर स्केटिंग हॉव्हरबोर्डस, मेट्रो प्लॅटफॉर्मवर गाणे आणि नाचणे, विक्री करण्यासाठी विविध स्टॉल, मेट्रो कोचमध्ये फॅशन शो इत्यादी कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या १७ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कौशल्ये प्रदर्शित केली.
या कार्यक्रमात २५ वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले होते.
या स्टॉल्समध्ये स्थापत्यशास्त्र मॉडेल्स, इलेक्ट्रिक वाहने, रस्ता सुरक्षा अभियान, ब्लॉक चेन लॉजिस्टिक मॉडेल्स यांचा अंतर्भाव होता. यात रांगोळी स्पर्धेने लोकांची मने जिंकून घेतली.
गरवारे कॉलेज मेट्रो पुणे स्टेशनवर ब्युटी अँड वेलनेस या विषयांचे विविध सत्र घेण्यात आले. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी मेकअप आणि नेल आर्टचे कौशल्य दाखवले. गरवारे मेट्रो स्टेशनला भेट देणाऱ्या मेट्रो प्रवाशांचा विद्यार्थ्यांच्या या कौशल्यावर विश्वास बसत नव्हता. ब्युटी अँड वेलनेस विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना ऐनापुरे यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता.