फिचरबॅक टू नेचरराष्ट्रसंचार कनेक्ट

स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी

अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर

मागील लेखामध्ये स्वसमुपदेशनाची पहिली पायरी कोणती? यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. आता स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी पाहूया. प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक समस्या या त्यांच्या विचारातून आणि परिस्थितीसोबत बरोबर समायोजन न करता आल्यामुळे निर्माण होत असतात. जेव्हा मानसिक त्रास सुरू होतो तेव्हा त्रास का होतो?

कोणत्या समस्या आहेत? समस्येची कारणे कोणती आहेत? हेच समजत नाही. अशा वेळी सतत गोंधळलेली मानसिकता राहते. समस्याच कोणती आहे, हे निश्चित करता येत नसल्यामुळे समस्येची कारणे कोणती आहेत, हे पण निश्चित करता येत नाही. मग उपाय- योजना तर दूरच राहतात.

प्रत्येक व्यक्तीला कुटुंब, मित्रपरिवार, नातलग, कार्यालय, शिक्षण, जॉब अशा ठिकाणी काम करताना अनेक समस्या निर्माण होत असतात, तर खूप वेळा स्वताकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, नियोजनाचा अभाव, आळशीपणा, विविध चुकीच्या सवयी, व्यसन यांसारख्या समस्या कमी-जास्त प्रमाणात असतात. या समस्या सोडविता नाही आल्या की, हळूहळू मानसिक स्वास्थ्य बिघडायला सुरुवात होते.

‘थेंब थेंब तळे साचे’ या म्हणीप्रमाणे, अनेक मानापमान, अपयश, राग, भीती, दुःख, टेन्शन, ईर्षा, द्वेष, इगो, असुरक्षितता, अस्वस्थता मेंदूमध्ये जमा होतात, मग त्याचे तळ्यात रुपांतर झाले की, झोप न येणे, अस्वस्थ वाटणे, सतत काही ना काही विचार मनात येणे, सतत निगेटिव्ह विचार येणे, भीती वाटणे, चिंता किंवा काळजी वाटणे अशा प्रकारचे मानसिक त्रास सुरू होतात. या मानसिक त्रासाचे वेळेच उपाय नाही झाले की, ते रौद्र रूप घेतात. मग आपल्या मानसिक त्रासाची कारणे वेळीच शोधून काढणे, कारणांना दूर करण्यासाठी, स्वतःच्या मनाला, भावनेला, विचाराला सावरण्यासाठी उपाययोजना करणे ही स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी आहे. राग, भीती, दुःख, टेन्शन, ईर्षा, द्वेष, इगो, अपमान, असुरक्षितता, अस्वस्थता या भावना आहेत, त्या निर्माण होतच असतात, त्यांना लवकर बाहेर काढणे हीच स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी आहे. थोडक्यात भावनांचे व्यवस्थापन हीच स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी आहे.

जर लवकर भावना नाही बाहेर पडल्या तर याचा परिणाम मेंदूतून स्रवणाऱ्या कार्टेसॉईल डोपामाईन, सेरोटोनीन, एन्ड्रॉफिन ऑक्सिटोसिन या हार्मोन्सवर पडतो आणि विविध शारीरिक आजार सुरू होतात. त्यामुळे स्वतःचे छंद जोपासणे, व्यायाम, योग करणेसोबतच मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घेणे हीच स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये