केंद्र सरकारचा मोठा निर्णय! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत झाली मोठी घट

नवी दिल्ली | सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे, कारण केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या दराबाबत (Gas Cylinder Price) मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पण आता केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
केद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरचे दर 200 रूपयांपर्यंत कमी होणार आहेत. आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे देशभरात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकराच्या या निर्णयानंतर सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा फायदा ‘या’ ग्राहकांना होणार
केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रूपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाचा फायदा सर्व ग्राहकांना होणार नाहीये. फक्त उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.