ताज्या बातम्यारणधुमाळी

…या कारणांमुळे चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात?

कोल्हापुर : निवडणूकी दरम्यान चंद्रकांत पाटील यांची काही विधाने, सरकार पडेल, पडणार आहे, १० मार्च नंतर पडेल, या सोबतच माझं चॅलेंज आहे, आज कोल्हापूर विधानसभेचा राजीनामा द्या आणि आज पोटनिवडणूक घ्या, निवडूण नाही आलो तर, राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या त्यांच्या विधानांचा फटका भाजपा पक्षला निवडणूकीत बसला का? पोटनिवडणूक असली तरी ती हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असल्याचे बोलले जाते. या कारणांमुळे चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आले आहे.

पोटनिवडणूकीच्या प्रचारामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांचा फटका पक्षाला बसला. अशी माहिती भाजपच्या गोठातुन बाहेर येत आहे. त्यामुळे पोटनिवडणूकीत पराभव तर झालाच, शिवाय पक्षाची प्रतिष्ठा देखील मलिन झाली आसल्याची माहिती आहे. पाटील यांची निवडणूकीतील पक्षाला अडचणीत आणणारी विधाने त्यांना भोवणार का? अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठांमध्ये सुरु झाल्याची बोलले जात आहे. या मुद्द्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे मत महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर भाजपचे वरिष्ठ नेते काय भुमिका घेतात हे देखील पहाणे महत्वाचे ठरणारं आहे.

कोल्हापूरात हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत लढण्यात आलेल्या निवडणूकीत पराभव स्विकारावा लागल्याने, पक्षाचा हिंदूत्वाचा मुद्दा फेल ठरतोय का? असा विचार देखील केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी केलेले एक विधान खुपच महागात पडले आहे. ते म्हणाले होते की, आमचा ‘पराभव झाला तर मी राजकारण सोडुन हिमालयात जाईन’ पाटील यांच्या या वक्तव्यावरून त्यांना सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंञी जितेंद्र आव्हाडांनी देखील यासंदर्भात एक मीम ट्विटरवर पोस्ट केली आहे. इतकेच नाही तर शिवसेनेकडून पोस्टर लावून चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला जातं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये