ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

बावनकुळेंचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले… “२०२४ मध्ये…”,

मुंबई : (Chandrashekar bawankule on uddhav thackeray) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, २०२४ मध्ये अंधेरीच्या निवडणुकीत आमचा उमेदवार प्रचंड ताकदीने जिंकून येईल. अंधेरीत काय होईल ते तुम्हाला २०२४मध्ये दिसेल”, अशा शब्दांत बावनकुळेंनी थेट ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आधी भाजपनं उमेदवार दिल्यावरून आणि नंतर उमेदवार माघारी घेतल्यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्याविरोधात भाजपनं उमेदवार उभा केल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत अशा वेळी बिनविरोध निवडणूक होऊ द्यायला हवी, असं ठाकरे गटाकडून सांगितलं जात होतं. राज ठाकरेंसह खुद्द शिंदे गटातीलही काही मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, अशी भूमिका मांडल्यानंतर अखेर भाजपनं उमेदवार मागे घेतला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये