बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, भाजप नेत्यांकडूनच पंकजा मुंडेंना बदनाम केलं जातंय…

मुंबई : (Chandrashekhar Bawankule On Pankaja Munde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पंकजा यांना डावलण्यात येत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या पक्षात नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारीत होताना दिसत होत्या. मात्र याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं गौप्यस्फोट गेल्यामुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान बावनकुळे म्हणाले, भाजपच्याच नेत्यांकडून (BJP Leader) पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर भाजपमधला कोणता असा नेता जो पंकजाला बदनाम करत आहे. दुसऱ्या बाजूला असाही प्रश्न उपस्थित होत आहे की, हे बावनकुळेला माहित आहे तर, मग ते त्या नेत्याला समज का देत नाहीत. किंवा वरिष्ठांच्या कानावर का घालत नाहीत.
पुढे बावनकुळे असं म्हणाले की, भाजपमधीलच एक युनिट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहेत. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बीडमधील स्टेजवरील व्हायरल व्हिडीओवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला. पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या असून, त्यावर अपमान समजणे हास्यास्पद आहे.” तर पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोपच बावनकुळे यांनी केला आहे.