छगन भुजबळांची तब्येत बिघडली, बाॅम्बे रूग्णालयात दाखल

मुंबई | Chhagan Bhujbal – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे ते बाॅम्बे रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच आज (7 नोव्हेंबर) संध्याकाळीच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
छगन भुजबळ यांनी व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर घरगुती उपचार केल्याची माहिती मिळत आहे. तसंच यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र आज सकाळी त्रास वाढल्यानं ते बाॅम्बे रूग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच त्यांना आजच संध्याकाळी डिस्चार्जही दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छगन भुजबळ त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून मास्क वापरत आहेत. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यावेळीही ते मास्क वापरत होते. तसंच भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकांच्या संपर्कात आल्यानं छगन भुजबळ आजारी होते. तेव्हा देखील ते मुंबईत काही दिवस उपचार घेत होते.