ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“पोरगा भारी आहे, उपोषण करणं सोप्प नाही…”, मुख्यमंत्र्यांनी केलं मनोज जरांगेंचं तोंडभरून कौतुक

जालना | Eknath Shidne – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जालन्यात (Jalna) येऊन भेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं आमरण उपोषण सोडलं. मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसोबत त्यांच्या वडीलांनाही सरबत पाजून त्यांचं उपोषण सोडलं. तसंच मराठा आंदोलकांकडून राज्य सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तर जरांगेंनी त्यांचं आमरण उपोषण सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं.

आंदोलकांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंचं कौतुक केलं. ते म्हणाले की, जरांगेंना पाहिल्यानंतर एक साधा, जिद्दी कार्यकर्ता कसा असतो ते कळालं. मी जरांगेंच्या बाबांना सांगितलं, तुमचा पोरगा भारी आहे. तुमचा पोरगा स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढतोय. तो एक निस्वार्थी आणि सच्चा माणूस आहे.

जेव्ही मी दिल्लीत गेलो होतो तिथेही मनोजची चर्चा सुरू होती. मला काही लोक म्हणाले, ये मनोज जरांगे कौन है? मी त्यांना म्हटलं, तो एक साधा कार्यकर्ता आहे. तर ते म्हणाले अरे उसनो तो सब को हिला दिया.. मनोज आज मी हे तुला का सांगतोय कारण तू साधा कार्यकर्ता आहेस म्हणून. तुझी दखल उच्च न्यायालयानं देखील घेतली आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये