ताज्या बातम्याशिक्षण

अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

मुंबई | CM Uddhav Thackeray Speak About HSC Result – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला आहे. तसंच निकाल लागल्यानंतर काहीजण निराश होतात आणि टोकाची पावलं उचलतात. तर अशाच विद्यार्थ्यांना मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांनी मोलाचा संदेश दिला आहे. बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री ठाकरेंनी अभिनंदन केलं आहे. तसंच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे की, “आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करुन घेत असते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. यानंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल असा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचुन न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचंच असेल.”

दरम्यान, यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी कमी लागला आहे. मागील वर्षी हा निकाल ९९.५३ टक्के लागला होता. तसंच यंदाच्या वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये