ताज्या बातम्यारणधुमाळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयामुळे शिवसेनेच्याच मंत्र्याला डच्चू?

मुंबई | Chief Minister Uddhav Thackeray On Subhash Desai – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेची जोरदार रस्सीखेच चालू असतानाच, आता विधान परिषदेचे देखील वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे वर्चस्व पणाला लागले आहे. प्रत्येकजण स्वतः ला सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयाने शिवसेनेच्या एका मंत्र्याला मंत्रीमंडळातून डच्चू मिळणार आहे हे निश्चित झाले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या निर्णयावरुन दुसरी एक शक्यता वाढली आहे. ती म्हणजे मंत्रीमंडळात विस्तार होऊन फेरबदल होण्याची? शिवसेनेने विधान परिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित केली आहेत. मात्र, विधान परिषदेचे आमदार असणारे आणि मंत्री असलेल्या सुभाष देसाई यांचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या उद्योगमंत्री पदाला आणि आमदारकीला डच्चू मिळणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे सध्या उद्योग, खाण आणि मराठी भाषा हे विभाग आहेत. जर त्यांची आमदारकी गेली तर त्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त मंत्रीपदावर राहता येणार नाही. यामुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार होणार का?, रिक्त असलेले आणि पदे कोणाला मिळणार? असे प्रश्न पुढे येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये