ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…हे उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाही”; बावनकुळेंच्या जहरी टीकेनं नवा वाद पेटणार?

जालना : (Chndrashekhar Bawankule On Uddhav Thackeray) सध्या राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर जागांच्या निवडणूकांचा धुराळा उडाला आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या उडताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर विविध जिल्ह्यांमध्ये प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

दरम्यान यावेळी बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली कामे शिंदे-फडणवीस सरकार असे ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण त्यांच्या टीकेत काहीच तथ्य नाही. विकास कामे करणे हे उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाही. तर ठाकरे फक्त सोन्याच्या चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावर काहीच बोलू नये, असं ते यावेळी म्हणाले.

पुढे बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळत जनतेसाठी काहीच विकास कामे केली नाहीत. ते त्यांच्या रक्तातच नाही, ते त्यांच्या आमदारांच्या पत्रावर देखील सही करत नव्हते. मग विकास कामे कशी होणार? ठाकरे विकासावर जेव्हा बोलतात, तेव्हा या गोष्टीचं मला वाईच वाटतंय. कोरोना काळात त्यांनी अठरा महिने मातोश्रीच्या बाहेर पाऊल ठेवला नाही. त्यांच्यामुळेच अनेक प्रकल्प त्यावेळी राज्याबाहेर गेली आहेत. त्यावेळी वेदांता प्रकल्पाला ते जागा देवू शकले नाहीत आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये