ताज्या बातम्यामनोरंजन

राज्यातल्या सत्तासंघर्षाला टक्कर देणारा सिटी ऑफ ड्रिम्सचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

City Of Dreams Season 3 : चित्रपटांबरोबरच वेब दुनियेतही सध्या निवडणुकांचीच हवा पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणावर आधारित नव्या वेब सीरिज विविध वेबपोर्टल्सवर सुरू झाल्या असून, आणखी काही लवकरच दाखल होत आहेत. आता सिटी ऑफ ड्रिम (City Of Dreams) या गाजलेल्या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

साम दाम दंड भेदाचा अवलंब करत सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होताना ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत वेगवेगळे लढणारे गायकवाड यंदा मात्र एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे गायकवाड आणि इतरांमधील सत्तेसाठीचा संघर्ष या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ कधी होणार रिलीज? (City Of Dreams Season 3 Release Date)

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत आहेत. 26 मे 2023 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांना आता या राजकीय नाट्य असणाऱ्या सीरिजची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये