वेदांतासंदर्भात ‘दूध का दूध पानी का पानी’ करण्याची अजित पवारांची मागणी

मुंबई Eknath shinde in dehli : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी आणि गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. तिथे मंत्र्यांशी ते महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. केंद्रातील मंत्र्यांशी वेदांता प्रकल्पावरून राज्यातील तरुणांची झालेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्याचं सर्वस्व पणाला लावून राज्यात प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विरोधी पक्षेनेते अजीत पवार यांनी केली आहे.
दूध का दूध पाणी का पाणी झालंचं पाहिजे : अजित पवार
अजित पवार यांनी वेदांत प्रकाल्पासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्याची एकनाथ शिंदे यांना मागणी तर केली आहे, त्याचबरोबर त्यांनी वेदांता प्रकल्प राज्यातून जाण्याबाबत चौकशी लावावीअशी विनंतीही केली आहे. अजीत पवार म्हणाले, “वेदांता प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला यावर मागील काही दिवसांपासून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, सध्या राज्यातही आणि केंद्रातही त्याचंच सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी या प्रकरणावर चौकशी बसवावी.”
“सत्ताधारी लोक जो महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत असं काहीही झालेलं नाही. तरीही यांनीचौकशी करुद्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या.” अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.