“…तर मी आत्ता राजीनामा लिहून देतो, पण एका अटीवर”: मुख्यमंत्री
कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला दिसत आहे. त्यावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतील याची सर्वजण वाट बघत होते. मात्र आज पाऊणे सहा वाजता मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी आणि शिवसेनेतील बंडखोरांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांना आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता राजीनामा देतो. तुम्ही येऊन राजीनामा घेऊन जा. त्याआधी तुम्ही समोर येऊन बोला. पण होणार मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल तर माझा राजीनामा घ्या’ असं मुख्यमंत्रीनी स्पष्ट केलं आहे. मला या पदावर राहण्याची इच्छा नाहीये हे मी अगोदरही बोललेलो आहे. आघाडीतील पक्षश्रेष्टींच्या आग्रहाखातर मी या खुर्चीवर बसलेलो आहे. असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह वर बोलताना भावूक झालेले देखील दिसत होते. ‘शिवसेना प्रमुखांसोबत ज्यांनी शिवसेनेला वाढवलं असेच महत्वाचे लोक जा माझ्या विरोधात जात असलतील तर नको आहे मला हि खुर्ची. त्यांनी सांगावं मी आत्ता राजीनामा देतो. जे आमदार सध्या शिवसेनेसोबत नाहीयेत ते मला आपले वाटतात, त्यांना मी आपला वाटतच नसेल तर तर मी इथे राजीनामा लिहून ठेवतो तो त्यांना राज्यपालांकडे घेऊन जावं.” असं मुख्यमंत्री म्हणाले.