ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलोय, अपमान सहन करणार नाही; कारवाईनंतर रजनी पाटील आक्रमक

नवी दिल्ली : (Congress MP Rajani Patil Suspended) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) विश्वासू अशी ओळख असणाऱ्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी शुक्रवार दि. 10 रोजी निलंबित केलं.

सभागृहाच्या कामकाजाचं चित्रीकरण केल्याबद्दल सभापती धनखड यांनी काँग्रेस खासदार पाटील (Rajni Patil) यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाकरिता निलंबित केलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता.

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलो आहोत. सभागृहातला हा अपमान सहन करणार नाही, उर्वरित अधिवेशन काय, पूर्ण टर्म निलंबित करा हवं तर अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी कारवाईनंतर दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये