देश - विदेशरणधुमाळी
गांधीजयंती निमित्त काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’; सोनिया गांधींची घोषणा

उदयपूर : येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेस ने अनेक नवीन गोष्टी करण्याचा निर्धार केला आहे. त्याच ठिकाणी बोलताना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वतीने काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारत जोडो यात्रा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
सोनिया गांधी यांनी सांगितलं की, गांधी जयंतीनिमित्त आम्ही 2 ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहोत. या यात्रेत सर्व युवक व सर्व नेते सहभागी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
या यात्रेमुळे जातीय सलोखा राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावरही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.