मनोरंजनमहाराष्ट्र

अभिनेता संदीप पाठकला ‘उत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार

विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही चपखलपणे साकारत चतुरस्र अभिनेते संदीप पाठकने मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे.

सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलंच गाजतंय. जागतिक कीर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवल्यानंतर त्याची पुरस्कारांची घोडदौड सुरूच आहे. त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव २०२२’ मध्येही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला.

तसेच ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२२’ या महोत्सवातही त्यांनी पुरस्कार पटकवत यशाची अनोखी हॅटट्रिक साधली आहे. याबद्दल बोलताना संदीप पाठक म्हणाला की, यंदाचं वर्ष माझ्यासाठी ख़ास आहे. कौतुकाची थाप माझा आनंद व हुरूप वाढवणारी असून, माझा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची ही मेहनत आहे.

मला भविष्यातही अनेक उत्तम चित्रपट करायचे आहेत. एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांना जे आवडेल ते देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. लवकरच माझे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यातील विविधांगी भूमिकासुद्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये