राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये कोकण ज्ञानपीठचे दारकर कॉलेज प्रथम

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
लोणावळा : सिंहगड इस्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल सायन्सेस लोणावळा यांच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी (फार्मसी मुले) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २० संघानी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोकण ज्ञानपीठ राहुल दारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्जत यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी पारनेर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला, तसेच ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी पुणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. त्यांची लढत सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल सायन्सेस लोणावळासोबत झाली. हा सामना अटीतटीचा झाला.
ट्रिनिटीने एका गुणाने विजय मिळविला. बेस्ट रायडर जयदीप पवार याला मिळाला. बेस्ट डिफेंडर सोमनाथ सालके मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी, बेस्ट ऑल राऊंडर ट्रॉफी जयेश गावंड, कोकण ज्ञानपीठ राहुल दारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्जत यांना मिळाली आला. या स्पर्धेसाठी विविध संस्थेतील क्रीडा व्यवस्थापक, स्पर्धक उपस्थित होते.
विजेत्या संघाला प्रॉव्हीडंट फंड अंमलबजावणी अधिकारी कुमार सिद्धार्था यांचे हस्ते रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळेस संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. प्रदिप नलावडे, डॉ. शिवाजी देसाई, निर्मलकुमार मिश्रा व कबड्डी शौकीन मोठ्या संख्येने हजर होते.