अस्सल, दर्जेदार चवीसाठी फक्त दत्तकृपा अमृततुल्य, स्नॅक्स सेंटर
आजकाल प्रत्येकाला चमचमीत, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला काहीना काही चवीष्ट पदार्थ खाण्याची चव सुटतेच. तसेच कोणताही पदार्थ खाण्यासाठी ठराविक अशी वेळ ठरलेली नसते जशी खाण्याची इच्छा होईल तसे खवय्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडतात, तर अशाच हौशी खवय्यांसाठी दत्तकृपा अमृततुल्य आणि स्नॅक्स सेंटर हे हॅाटेल प्रसिद्ध आहे. मालक अंकुश फंड यांचे दत्तकृृपा अमृततुल्य आणि स्नॅक्स सेंटर हे हॅाटेल खिरडवस्ती मोशी, पुणे-नाशिक हायवेच्याशेजारी आहे.
दत्तकृपा अमृततुल्य आणि स्नॅक्स सेंटर हॅाटेलचा स्पेशल चहा, कांदा भजी, पोहे, वडापाव, पॅटिस, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स असे अनेक स्वादिष्ट पदार्थ त्यांची खासियत आहेत. तसेच या हॅाटेलमध्ये येणारा प्रत्येक खवय्या हा येथील पदार्थांची चव घेऊन खुश तर होतोच, पण तिथले आदरातिथ्य त्यांना या हॅाटेलमध्ये पुन्हा पुन्हा यायला भाग पाडते.
दत्तकृपा अमृततुल्य आणि स्नॅक्स सेंटर हॅाटेलबद्दल विशेष सांगायचे झाले तर या हॅाटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडेल अशा दरात मिळतात. त्यामुळे येथे खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. सोबतच येथे बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण आणि पदार्थांची चव यामुळे हे हॅाटेल सर्वांच्या आवडीचे बनले आहे. त्यामुळे खवय्यांना चमचमीत पदार्थ खायची चव सुटली असेल किंवा सुटीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परिवारासोबत टाईम स्पेंड करायचा असेल तर आवर्जून दत्तकृपा अमृततुल्य आणि स्नॅक्स सेंटर हॅाटेलला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भेट द्या.