दिल्ली महापालिकेत ‘आप’ला बहुमत, भाजपच्या सत्तेला सुरूंग

नवी दिल्ली | Delhi MCD Result 2022 – आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) दिल्ली महापालिका निवडणुकीत चांगलीच बाजी मारली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आपनं भाजपच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. मागील 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपची (BJP) सत्ता होती. मात्र, आपनं 233 जागा जिंकत दिल्ली महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे.
दिल्ली महापालिकेच्या 250 पैकी 233 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये ‘आप’ला 126 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजप 97 जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसनं 7 जागांवर विजय संपादन केला आहे. तर 3 अपक्ष उमेदवारांचा विजय झाला असून अजून 17 जागांचे निकाल येणं बाकी आहे.
दरम्यान, भाजपची दिल्ली महापालिकेवरील दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. यामध्ये भाजपनं कडवी लढत दिली आहे. दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (7 डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते.
One Comment