Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशमुंबई

श्रद्धा वालकर हत्याकांडाचे मुख्य कारण झाले स्पष्ट, पोलिसांकडून तब्बल ६००० पानांचे चार्जशीट दाखल

नवी दिल्ली : Shraddha Valkar Murder case : श्रद्धा वालकर हत्याकांडासंबंधित (Shraddha Walkar Murder Case) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात तब्बल ६६२९ पानांचे चार्जशीट (Shraddha Walkar charge sheet) पोलिसांनी दिल्ली न्यायालयासमोर (Delhi Court) दाखल केले आहे. दरम्यान, आफताब पूनावालाने (Aftab Poonawalla) श्रद्धाचे ३५ तुकडे का केले याचा देखील खुलासा पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. आरोपी आफताबची न्यायालयीन कोठडीत आता ७ फेब्रुवारी पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत आफताबला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, आफताबने आपला वकिल बदलण्याची मागणी देखील केल्याची माहिती आहे. (Delhi Police Submitted 6629 Pages Charge Sheet Against Aftab Poonawalla Shraddha Walkar Murder case)

आफताब पूनावाला (Aftab Poonawalla) आणि श्रद्धा वालकर कथितरित्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. १८ मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली. आणि तिचा मृतदेह काही काळ ३०० लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. नंतर त्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते छतरपूरच्या जंगलात फेकून दिले होते. (Shraddha Walkar Murder Case)

आफताबने श्रद्धाची हत्या का केली? (Why Aftab Killed Shraddha?)

श्रद्धाची हत्या करून तिचे ३५ तुकडे जंगलात फेकून दिले या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त केला गेला. मात्र, या प्रकरणाला अनेकांनी लव जिहादचा प्रकार असल्याचं देखील म्हटलं आहे. मात्र, आफताबने एवढी क्रूर पद्धतीने हत्या करण्याचे कारण काय होते याबाबत पोलिसांच्या चार्जशीटमध्ये सांगण्यात आले आहे. श्रद्धा अगोदरच्या दिवशी मित्राला भेटायला गेली होती. त्यामुळे आफताबला राग आला आणि त्याने श्रद्धाचा गळा दाबून हत्या केली. (Reason Behind Aftab Poonawalla Killed Shraddha Walkar)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये