“अशा अवस्थेत महाराष्ट्रात कोण येणार…”; फडणवीसांचा पलटवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात येणाऱ्या जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेऊन स्वत:च्या राज्याचा विकास करतात, असा आरोप नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला होता. आता याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कोणीही यायला का तयार नाही, या गोष्टीचं आत्मचिंतन शरद पवार यांनीच करायला पाहिजे. पाच वर्षांनंतर महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरु झाले आहे. राज्यातील दोन मंत्री तुरुंगात आहेत. अशा अवस्थेत महाराष्ट्रात कोण येणार आहे.
तसेच मॉरिशिअसचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक उपसचिव पाठवून देण्यात आला. अशा पाहुण्यांसाठी जी अलिशान गाडी द्यावी लागते, ती गाडीदेखील पाठवण्यात आली नाही. त्यांच्यासाठी साधी गाडी पाठवण्यात आल्याचं उदाहरण सांगत फडणवीसांनी यावेळी मविआ सरकारला डिवचलं आहे.
दरम्यान . हनुमान चालीसा बोलू, असे म्हणणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाऊन अटक केली जाते. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानमध्ये बोलणार का?, असं म्हणत राणा दांपत्य अटक प्रकरणी त्यांनी सरकारला यावेळेस चांगलंच धारेवर धरलं आगहे