ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आम्हाला कळलंय कॉंग्रेसचे तीन आमदार फुटले”

Vidhanparishad Election | विधानपरिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु झालेली आहे. दुपारी ४ च्या अगोदरच सर्व पक्षांच्या आमदारांनी आपली मतदान प्रक्रिया पार पाडली आहे. आता सगळ्याच पक्षांचे नेते आपापल्या आमदारांसोबत भेटीगाठी घेताना दिसत आहेत. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी समोरून येत कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांची चांगलीच मस्करी केली. त्यावेळचा व्हिडीओ व्हायरल होऊन चांगलाच चर्चेत आहे.

आपल्या भाजप आमदारांसोबत विधानपरिषदेच्या लॉबीतून जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी समोरून येत असलेल्या कॉंग्रेस नेत्यांची मस्करी केली. “आम्हाला कळतंय कॉंग्रेसचे तीन मतदार फुटले…” असा शाब्दिक हल्ला फडणवीस यांनी कॉंग्रेस नेत्यांवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावेळी प्रवीण दरेकर, प्रशांत बंब आणी इतर आमदार होते. समोरून कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील येत होते. लॉबीमधून चालताना दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर आले होते. यावेळी फडणवीस यांनी जोरात हसत ‘आम्हाला कळलं कॉंग्रेसचे तीन आमदार फुटले’ असं वक्तव्य केलं. त्यावेळी लगेचंच पाटील यांनी प्रातीक्रिया दिली आणि म्हणाले ‘मी नाही’ तेव्हा फडणवीस म्हणाले ‘अरे हो, तो नाही’. दोन्हीही पक्षांचे नेते जोरजोरात हसायला लागले.

आजची निवडणूक खूपच अटीतटीची होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकींच्या निकालाकडे लागलेलं आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत होतं. मात्र फडणवीस यांनी संधी साधून कॉंग्रेसची मस्करी केल्याच चित्र दिसून आलं आहे. लवकरच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सगळ्यांचे लक्ष या निकालाकडे लागलेले दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये