दिल्ली दूर…! बाजार समितीच्या गल्लीतच, भाजपला शिंदे गटाचं ओझ; ‘युती’ला फुटीचे फटाके…
जळगाव : (Devendra Fadnavis On Eknath Shinde) भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता हवी होती. त्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली. आता तर शिंदे यांना शिवसेना पक्ष व धनष्युबाण चिन्हही मिळालं आहे. त्यामुळं आमची त्यांच्याशी युती आहे, त्याच बळावर आम्ही दिल्लीतील सत्ता कायम ठेवणार आहेत, असा दावाही केली जात आहे. परंतु दुसरीकडे वास्तव मात्र वेगळचं दिसत आहे. दिल्लीच्या निवडणूका तर दूरच; परंतु बाजार समितीच्या निवडणूकीतच भाजपला शिंदे गटाचं ओझं वाटू लागल्याचं दिसत आहे.
त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आता युतीबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय नेत्यांवर सोपविला आहे. त्यांच्या बैठकीत काय निर्णय होईल, याकडं लक्ष आहे. मात्र, स्थानिक स्तरावर भाजप व शिंदे गटात फुटीचे फटाके वाजू लागल्याचे चित्र दिसत आहे.
जळगावत जिल्ह्यातील बारा बाजार समित्त्यांच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर ग्रामीण स्तरावर ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीनंतर राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आणि त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळं राज्यात सत्ताधारी भाजप व शिंदे गट युतीचं की महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे, याबाबत चित्र काही अंशी स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निवडणूकीची दिशाही ठरणार आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
बाजार समिती निवडणूक ही ग्रामीण भागात पक्षाचा पाया भक्कम करण्याची निवडणूक आहे. त्या ठिकाणी एकी असल्यास आपला विजयाचा मार्ग सुकर असंल, तसंच या एकीतून आपल्याला भविष्याच्या निवडणूकीतही यश मिळंल हे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीनं ओळखलं.
त्यामुळे बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून समोर जाण्याबाबत त्यांनी निर्णय घेतल्याचं दिसत आहे. जळगाव बाजार समितीबाबत महाविकास आघाडीची पहिली बैठक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्त्वाखाली जळगावात झाली. आता पारोळा येथे माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची बैठक होत आहे. विरोधी पक्षांनी आपली एकत्रित मोर्चेबांधनी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, दिल्लीपर्यंत युती करण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाची गल्लीत दिल जमाई होताना दिसत नाही.