ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“त्यांच्यावर बोलणे म्हणजे, आपल्याच तोंडाची वाफ गमावणे” देवेंद्र फडणवीस

मुंबई : (Devendra Fadnavis On Sanjay Raut) गुरुवार दि. 28 रोजी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यास, सत्तांतर झालं तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचीच सत्ता येईल असं म्हणणारे भाबडे आहेत. त्यांच्यावर बोलणं म्हणजे “तोंडाची वाफ घालवणं आहे”. तसचं ३२ दिवस पाच लोकांचं ज्यांनी सरकार चालवलं त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांचं नाव न घेता मुंबईत पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूनं लागणार असल्याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये