ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

‘एकनाथ’ आहात एकनाथच राहा, ‘ऐकनात’ होऊ नका”; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई पावसाळी अधिवेशन (Monsoon Sassion) : सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक चर्चा आणि निर्णय यावेळी सरकारकडून घेतले जात आहेत. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून आणि सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांवरून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाना साधला जात आहे तर, सरकारकडून त्यांना प्रतिउत्तरे दिली जात आहेत. दरम्यान, आज अधिवेशानात महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय बदलला असल्याची टीका करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे.

नगरपरिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत यासंबंधीच्या विधेयकाला आज विधिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केली. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथच’ राहावे , ‘ऐकनाथ’ होऊ नये” असा टोला त्यांनी विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांना लागावला.

मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवडायचा असा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर केला होता. मात्र आज पुन्हा एकदा नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडण्यात यावा हा निर्णय पारित करण्यात आला आहे. त्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली गेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये