वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे सिनेसृष्टीत कमबॅक
![वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे सिनेसृष्टीत कमबॅक rashtrasanchar news 2023 03 21T160853.202](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/rashtrasanchar-news-2023-03-21T160853.202-780x470.jpg)
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 60च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये धर्मेंद्र (Dharmendra) यांचे नाव टॉपला होते. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. अनेक सुपरहिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावे आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी देखील त्यांचा चाहतावर्ग कायम आहे. धर्मेंद्र हे चित्रपटसृष्टीपासून गेली काही काळ दूर असले तरी त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमात धर्मेंद्र महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
धर्मेंद्र यांचा ‘यमला पगला दीवाना-फिर से’ हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात से बॉबी देओलसोबत दिसले होते. या सिनेमानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. आता पुन्हा एकदा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या बहुचर्चित सिनेमाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहेत.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.