महाराष्ट्ररणधुमाळी
लाऊडस्पीकरसंदर्भात गाईडलाईन्स जारी होणार ; गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीनवरील भोंगे काढण्यात यावेत नाहीतर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा केला. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली कि, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात आता राज्य सरकारनं नव्या गाईडलान्स आणण्याच्या तयारीत आहे.
तसेच लवकरच गाईडलाईन्स कधी जाहीर होतील राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे मिळून या गाईडलाईन्स तयार करणार असल्याचं ही त्यांनी म्हंटलं . लाऊडस्पीकर वाजवण्यासंदर्भात एक- दोन दिवसात गाईडलान्स जाहीर केल्या जातील अशी माहिती ही त्यांनी दिली.