Top 5महाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही”

मुंबई – Dipali sayyad on Kirit Somaiya | राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे. आमदारांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या हालचाली चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही. दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही. पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी पंचप्रधानांवर टीका करताना केलेली टीका अजुनही चर्चेत आहे.

दरम्यान, दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमलाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडग ढोंग करतय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार, असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये