Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही, एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही”

मुंबई – Dipali Sayyed on CM |  राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेनेचे  संजय पवार यांचा पराभव झाला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.

एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही. तसेच एका राज्यसभेने कोल्हापूरची पोटनिवडणूक जिंकता येत नाही .106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रसेचे इमरान प्रतापगढी यशस्वी झाले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये