ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

“कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा…”, दिग्दर्शक विजू माने यांची पोस्ट चर्चेत

मुंबई | Viju Mane – शिवसेनेच्या इतिहासात काल (5 ऑक्टोबर) पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. एकीकडे शिवसेनेचा (Shivsena) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर दुसरीकडे शिंदे गटाचा (Shinde Group) बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. यासंदर्भात समाजमाध्यमात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तसंच मराठी कलाकार देखील सध्या सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य करताना दिसून येत आहेत. यामध्ये मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनी देखील शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या भाषणाबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दिग्दर्शक विजू माने हे नेहमी चर्चेत असतात. ते समाजात घडणाऱ्या घटनांवर कायमच भाष्य करत असतात. तसंच सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली होती. आता देखील त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर एक पोस्ट शेअर केली आहे.

विजू माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक माणूस झोपलेला दाखवला आहे आणि त्या फोटोवर कॅप्शन दिलं आहे की, ‘स्वत: उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा…मला झेपेल ते मी करतो…, असं लिहलं आहे. तसंच पोस्टखाली त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, माझी झोप मला प्यारी …गेली दुनियादारी. stop being political expert. better leave them upto politicians’, अशी पोस्ट विजू माने यांनी शेअर केली आहे तसंच त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये