ताज्या बातम्यामनोरंजन

दिव्यांका त्रिपाठी प्रेग्नंट? पती विवेक दहियानं दिली माहिती; म्हणाला, “खरोखरच आनंदाची बातमी…”

मुंबई | Divyanka Tripathi – अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. दिव्यांका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. तसंच आता दिव्यांका चांगलीच चर्चेत आली आहे. दिव्यांका प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातंय. याबाबत दिव्यांकाचा पती विवेक दहियानं (Vivek Dahiya) स्पष्टीकरण दिलं आहे.

विवेक दहियानं इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितलं की, मला समजत नाही की हे आमच्यासोबत का होतं. सोशल मीडियावर अनेकदा याबाबत बोललं जातं. पण हे खरं नाहीये. दिव्यांका प्रेग्नंट नाही. जेव्हा ही गुड न्यूज असेल तेव्हा आम्ही स्वत: चाहत्यांना सांगू.

दरम्यान, दिव्यांका आणि विवेक ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. आता त्यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसंच दिव्यांका आणि विवेक हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये