“खरच मी लायक आहे की नाही…”; अभिनेता गौरव मोरेची पोस्ट चर्चेत
!["खरच मी लायक आहे की नाही..."; अभिनेता गौरव मोरेची पोस्ट चर्चेत more gaurav](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/more-gaurav-780x470.jpg)
मुंबई | Actor Gaurav More’s Post Viral | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyjatra) हा मराठी कार्यक्रम (Marathi Show) लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. तसंच हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षाकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमातील अनेक हास्यसम्राट हे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमातील विनोदवीर अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) हा काहीना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता देखील तो चर्चेत आला असून त्याला भिमरत्न पुरस्काराने (Bhimratn Award) गौरवण्यात आले आहे.
भिमरत्न पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात गौरव मोरेला भिमरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर गौरवने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे. तसंच या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये तो भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. Actor Gaurav More’s Post Viral |
गौरव मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “भिमरत्न पुरस्कार सोहळा २०२२, खरच मी हया पुरस्काराच्या लायक आहे की नाही अजुनही कळत नाहीये. सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकुन देणारयांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे.आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्यासारख्याला पण एवढा मोट्ठा मान आपण दिलात. खुप आभारी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्याहस्ते हा पुरस्कार देन्यात आला. सोबत महाराष्टाचे ख्यातनाम गायक आनंद शिंदेसाहेब (Anand Shinde), मिलिंद शिंदेसाहेब (Milind Shinde) आणि मधुर शिंदे (Madhur Shinde) उपस्थित होते. धर्मात्मा फाउंडेशन चे खुप खुप आभार मानतो. सर्व प्रेकक्षकांचे आभार मानतो.” अशी पोस्ट गौरवने शेअर केली असून त्याच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.