Top 5ताज्या बातम्यामुंबई

…अन् मिळवा अमृता फडणवीसांकडून लाईक, अमृता फडणवीसांची खास मंडे ऑफर!

मुंबई – Amruta Fadnavis Monday Twit – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. महाविकास आघाडी सरकारवरही टीका करत असतात, अशातच अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे.

यामध्ये ट्विटमध्ये त्यांनी, रिकाम्या जागा भरा असा प्रश्न देत. आज मै…. आणि तीन पर्याय दिले आहेत. त्यामधील पहिल्या पर्यायामध्ये मी कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. दुसरा पर्याय हा मी दु:खी प्रेमगाणं लिहित आहे. तिसऱ्यामध्ये, पावसाळा सुरू होण्याआधी मुंबईच्या रस्त्यांचा आढावा घेत आहे.

दरम्यान, हे तीन पर्याय देत, जो बरोबर उत्तर देईल त्याला एक लाईक मिळणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या प्रश्नावर संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये