राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू घेणार ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट?

मुंबई : (Draupadi Murmu will meet Uddhav Thackeray) भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएकडून राष्ट्रपतिपदासाठी आदिवाशी महिला असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार दिली आहे. मुर्मू या आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या पाश्वभुमीवर शिंंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मुंबई दैऱ्यादरम्यान मुर्मू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घ्यावी अशी इच्छा त्यांनी माध्यमांद्वारे केली आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुर्मू या मुंबईत भाजप खासदार आणि शिंदे गटातील नेत्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांच्या बैठकीचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हतं.
मुर्मू-ठाकरे भेट घडवून आणण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मध्यस्थी करणार आहेत. उद्धव ठाकरेंसोबत तावडे यांचे चांगले संबंध आहेत. यामुळं भाजप नेतृत्वाकडून विनोद तावडे यांच्यावर उद्धव ठाकरे आणि द्रौपदी मुर्मू यांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, ही भेट मातोश्रीवर होणार नसून, पंचतारांकित हॉटेलमध्ये होईल, असा आंदाज वर्तावला जात आहे.