अर्थताज्या बातम्या

‘या’ कारणामुळे ब्रेडच्या किंमतीतही झाली वाढ

मुंबई : काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली होती. यामध्ये पेट्रोल-डिझेल, गॅस सारख्या वस्तूंच्या दरात वाढ झाली होती यानंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. स्लाईस ब्रेडच्या दरात २ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळं आता सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार आहे.

स्लाईस ब्रेडच्या दरात २ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे तसंच गेल्या पाच महिन्यात ब्रेडच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यावर्षी केंद्रीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यावर्षी खुल्या बाजारात गव्हासाठी विक्री योजना जाहीर न केल्यामुळं मे महिन्यापासूनच ही दरवाढ अपेक्षित होती. त्यानुसार ब्रेडच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर इंधनाच्या दरवाढीमुळं इतर सर्वच वस्तूंच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, वाढत्या इंधनाच्या किंमती देखील ब्रेडच्या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.

दरम्यान, आता ब्रेडच्या नव्या दरवाढीनुसार पांढऱ्या ब्रेडची किंमत 33 रुप्यावरून 35 रूपये झाली आहे. तर सॅंडवीचसाठी स्टॉलवर वापरल्या जाणाऱ्या ब्रेडची किंमत ६५ रुपयांवरुन ७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर ब्राऊन ब्रेडची किंमत ४५ रुपयांवरुन ५० रुपये झाली आहे. तसंच ब्रेडच्या दरवाढीमुळं सँडविचच्या दरांवरही वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये